
पाथ्रीकर कॅम्पस येथे मुलींची कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न
छत्रपती संभाजीनगर ः बदनापूर येथील पाथ्रीकर कॅम्पस येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन मुलींच्या कबड्डी स्पर्धेत जालन्याचा मत्स्योदरी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचा संघ विजेता ठरला.
डॉ बाबासाहेब आबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाथ्रीकर कॅम्पस बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन मुलींची कबड्डी स्पर्धा महाविद्यालयाच्या इनडोअर हॉल येथे संपन्न झाली. या स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाचे माजी क्रीडा संचालक तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे माजी कार्याध्यक्ष व निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टचे संस्थापक डॉ दत्ताभाऊ पाथ्रीकर यांच्या हस्ते झाले.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ विजयभाऊ पाथ्रीकर, डॉ सोनाली पाथ्रीकर, प्रा दिगंबर तौर, डॉ नाजमा खान तथा विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ सचिन देशमुख हे उपस्थित होते. मौलाना आझाद महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ एम ए बारी हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ माणिक राठोड यांचा विशेष सत्कार करणात आला. तसेच नुकत्याच झालेल्या आंतरमहाविद्यालयीन कबड्डी मुलांच्या स्पर्धेत बदनापूर संघाने प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल सर्व खेळाडूंचा सत्कार मान्यवराच्या हस्ते संपन्न झाला.
या स्पर्धेत विद्यापीठाअंतर्गत असलेल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व धाराशिव या चार जिल्ह्यातील आठ संघानी सहभाग घेतला होता. तर अनेक महाविद्यालयातील खेळाडू निवड चाचाणीसाठी उपस्थित होते. सदरील स्पर्धेत अंतिम सामन्यात जालना येथील मत्स्योदरी शारिरिक शिक्षण महाविद्यालयाचा संघ विजेता ठरला. तर एसपीपीएम महाविद्यालय, सिरसाळा येथील संघ उपविजेता ठरला. या संघांना मेडल, प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
या बक्षिस वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ देवेश पाथ्रीकर, डॉ नाजमा खान हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव डॉ एम डी पाथ्रीकर या होत्या.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंच म्हणून राजू थोरात, संतोष नागवे, नाना पाटोळे, तुकाराम दौड, शंकर भंडारे, डॉ माणिक राठोड, डॉ लक्ष्मण जाधव, डॉ भुजंग डावकर, डॉ बप्पासाहेब मस्के यांनी काम पाहिले. यावेळी विद्यापीठाचा संघ निवडण्यात आला. विद्यापीठ निवड समिती सदस्य म्हणून डॉ मनीषा पवार, डॉ राणी पवार, सारिका जगताप व भीमा माने यांनी काम पाहिले. उत्कृष्ट २० खेळाडूंची यावेळी निवड विद्यापीठाच्या संघासाठी प्राथमिक स्वरुपात करण्यात आली.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक, विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉ एस एस शेख, डॉ हरून कुरेशी, डॉ नाजमा खान, प्रभारी प्राचार्य डॉ जाकेर पठाण, डॉ मुंगे, डॉ राजळे, डॉ निहाल, डॉ चोपकर, डॉ जीवनज्योती निकाळजे, डॉ सलमा शेख, डॉ बुरांडे, श्रीमती देशमुख, डॉ गावंडे, नंदकिशोर नाईक्वाडे, श्रीमती धुमाळ, मनोज गजर, शिवाजी चव्हान, सचिन कळवत्रे, रवी खांडेभराड, डॉ आबेद शेख यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ शफी शेख, डॉ डी डी देशमुख, प्रा गीतेश व्यास यांनी केले. तर प्रास्ताविक डॉ एस एस शेख यांनी केले. प्रा श्रीनिवास मुंगे यांनी आभार मानले.