 
            छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आंतर शालेय खो-खो स्पर्धा स्वामी ब्रम्हानंद माध्यमिक विद्यालयात उत्साहात संपन्न झाली.
तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत होणाऱ्या शालेय खो-खो स्पर्धेचे आयोजन गेल्या तीन वर्षांपासून पिंप्री राजा येथे होत आहे. क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शालेय समिती अध्यक्ष दादासाहेब घोरपडे, सुनील झांजरी, शाळेचे मुख्याध्यापक दिनेश देशपांडे, सुरेश पठाडे, पुंगळे सर व सर्व सहभागी शाळेतील क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
या स्पर्धेत एकूण ३२ शाळांनी सहभाग नोंदवला आहे. दुसऱ्या दिवशी पैठण विधानसभा सदस्य आमदार विलास बापू भामरे, पोलीस निरीक्षक कराड सम्राट सिंग राजपूत, अशोक जिजा पवार यांनी स्पर्धेला सदिच्छा भेट दिली व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
पंच म्हणून पुंगळे सर, घोडके सर, अंकुश साळवे, गोकुळ ढुमसे, राहुल सरोदे, राजपूत सर यांनी पाहिले. समन्वयक व सरपंच म्हणून सुरेश पठाडे व ज्ञानेश्वर थोरे यांनी भूमिका बजावली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी तालुका संयोजक गणेश बेटुदे, संजय साखरे, बाबासाहेब काकडे, गुलबर्गा मेश्राम, बालाजी बोंगाणे, संदीप शिंदे यांनी परिश्रम घेतले.



