
धुळे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंडर १५ मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत बीड महिला संघाने जळगाव महिला संघाचा नऊ विकेट राखून मोठा पराभव केला. या लढतीत स्नेहा जगताप ही सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली.

या सामन्यात जळगाव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत १८ षटकात बिनबाद ९७ धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना बीड संघाने १७ षटकात एक बाद ९८ धावा फटकावत नऊ विकेट राखून सामना जिंकला. स्नेहा जगताप सामनावीर ठरली.
या सामन्यात स्वामिनी बेलेकर हिने सर्वाधिक ६९ धावा फटकावल्या. तिने अर्धशतकी खेळी करताना ९ चौकार व १ षटकार मारला. स्नेहा जगताप हिने ३९ धावांची शानदार खेळी केली. तिने एक चौकार मारला. गायत्री कोळी हिने तीन चौकारांसह २६ धावांचे योगदान दिले.
या सामन्यात अनिल वाडेकर व विजय अग्रवाल यांनी पंच म्हणून काम पाहिले. कविता कुवर यांनी स्कोअरर म्हणून काम पाहिले. धुळे जिल्हा क्रिकेट संघटनेने स्पर्धेची सर्व व्यवस्था चोख ठेवली आहे. स्पर्धेचे खूप चांगले नियोजन केले आहे आणि महिला खेळाडूंची विशेष काळजी घेतली जात आहे.