राज्य बास्केटबॉल स्पर्धेत पुणे जिल्ह्यास दुहेरी मुकुट

  • By admin
  • September 15, 2025
  • 0
  • 24 Views
Spread the love

मुंबई संघ उपविजेता, नागपूर, सातारा संघ तृतीय

सोलापूर ः पुणे जिल्ह्याच्या मुले व मुली संघाने १३ वर्षांखालील गटाच्या राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादला.

केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात पुण्याने मुंबई उत्तर संघावर ४५-१२ असा दणदणीत विजय मिळवला. रुद्रानी हलीघोंगडे (१६ गुण) व तनिरिका चक्रवर्ती (१०) यांचा संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण वाटा होता. मुंबईच्या आकांक्षा शेठ व किरत कौर कौसल (प्रत्येकी ३ गुण) यांचे प्रयत्न अपुरे पडले

मुलांच्या गटात आराध्य भावसार व मयंक शर्मा (प्रत्येकी १६ गुण) व चिराग कुलश्रेष्ठ (११) यांच्या बहारदार खेळीमुळे पुण्याने मुंबई दक्षिण पूर्व संघावर ६१-३८ अशी एकतर्फी मात केली. मुंबईकडून मयंक गायकवाड व जाडेन ब्रिटो (प्रत्येकी ९ गुण) यांनी एकाकी लढत दिली.

नागपूर व सातारा तृतीय
मुलांच्या गटात नागपूर व मुलींच्या गटात साताराने तृतीय स्थान संपादले. मुलांच्या गटात नागपूरने ठाण्यावर ३६-९ अशी एकतर्फी मात केली. मुलींच्या गटात मध्यंतराच्या ८-११ अशा पिछाडीवरून साताराने कडव्या लढतीनंतर नागपूरला २७-२५ असे दोन गुणांनी नामविले.

पारितोषिक वितरण

खासदार प्रणिती शिंदे व सिंहगड इन्स्टिट्यूटचे सहसचिव संजय नवले यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी राज्य बास्केटबॉल संघटनेचे सचिव गोविंद मुथुकुमार, सहसचिव ललित नहाटा व जयंत देशमुख, जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष के डी पाटील, उपाध्यक्ष मनोज यलगुलवार, सचिव साकीब शेख, खजिनदार दिनेश सारंगी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *