
छत्रपती संभाजीनगर ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच महानगरपालिका व शहर बॉक्सिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मनपा अंतर्गत जिल्हास्तरीय १७ आणि १९ वर्षांखालील शालेय मुलींची बॉक्सिंग स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल गारखेडा येथे उत्साहात संपन्न झाली.
अंतिम सामन्याच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अभिजीत देशमुख व डॉ चंद्रशेखर चव्हाण आणि क्रीडा अधिकारी गणेश पाळवदे व स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे प्रशिक्षक सोनू टाक व मनपाचे क्रीडा अधिकारी संजीव बालय्या, क्रीडा शिक्षक रोहन टाक यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेत पंच म्हणून राहुल टाक, रवींद्र माळी, अनिल मिरकर, वैभव ढवळे, विश्वजीत शुक्ला, प्राची जमाले, ईश्वर साळुंखे, सुरज बचके, ईशान लाहोट, सोमेश गोयल, जयराज साळवे, शिवराय गरुड, फैज सिद्दीकी यांनी काम पाहिले.
या स्पर्धेत विविध वजन गटात खेळाडूंनी चमकदार कामगिरी नोंदवत पदकांची कमाई केली. त्यात अनुष्का जैन (रिव्हरडेल हायस्कूल), विशाखा सारसर (गुजराती कन्या विद्यालय), भूमी पुणे (नरेंद्र हायस्कूल), दिशा सोनवणे (देवगिरी महाविद्यालय), ओवी अदवंत (सरस्वती भुवन), अंकिता वाघमारे (होलीक्रॉस हायस्कूल), चंचल पवार (ब्लूमिंग बर्ड्स), श्रावणी भोसले (देवगिरी महाविद्यालय), शर्वरी राठोड (देवगिरी महाविद्यालय), अपूर्वा राऊत (अग्रसेन विद्यामंदिर), शुभांगी शिंपी (सरस्वती भुूवन) या खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंनी आपापल्या वजन गटात सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.