
धुळे ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे व धुळे जिल्हा तलवारबाजी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तरीय ग्रामीण व मनपा तलवारबाजी स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलात मोठ्या उत्साहात घेण्यात आली.
जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत ३६८ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. तलवारबाजी स्पर्धेसाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक अशोक धनगर हे होते. राधाबाई धनगरयांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी एम के पाटील यांची उपस्थिती होती.
तलवारबाजी संघटनेचे सचिव कैलास कंखरे, प्रा पाटील, अभय कुलकर्णी, प्रशांत धनगर, योगेश्वरी मिस्तरी, स्वप्नील बोंडे, विशाल पवार, विशाल राव यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा क्रीडा अधिकारी एम के पाटील यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. जिल्हा सचिव कैलास कंखरे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करत आपल्या भाषणात नियमित सराव व नियमित अभ्यास यांचे वेळेचे नियोजन केल्याने खेळाडूंना जागतिक स्तरावर यश प्राप्त करू शकतात. खेळामुळे आपल्या जीवनातील चढउतराला सामोरे जाण्याची सवय होते असे सांगितले.
राष्ट्रीय तलवारबाजी खेळाडू आयुष प्रणव पाटील व प्रजिता कैलास कंखरे व राज्यस्तरीय पदक प्राप्त खेळाडू पार्थ उमेश ठाकरे, युशिता शिंदे, गिरीराज पाटील, यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पंच म्हणून विशाल पवार, विशाल राव, रोहित धनगर, मयूर माळी, ओम धनगर, निखिल पाटील, कृष्णा धाकड यांनी काम पाहिले व क्रीडा विभागचे योगेश देवरे, मदन गावित, ज्ञानेश्वर यांनी परिश्रम घेतले. तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष सतीश महाले यांनी खेळाडूंना दुरध्वनी वरून शुभेच्छा दिल्या.