
चिखली ः हल्दवानी (उत्तराखंड) येथे नुकत्याच झालेल्या २० व्या राष्ट्रीय कॅडेट तलवारबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी इप्पी प्रकारात कांस्य पदक प्राप्त केले. तर मुलांनी इप्पी प्रकारात रौप्य पदक प्राप्त केले.

मुलींच्या संघात वेदश्री देशमुख तर मुलांच्या संघात संकेत अंभोरे हे दोन्ही खेळाडू बुलढाणा जिल्हा तलवारबाजी संघांचे होते. या खेळांडूना अक्षय गोलांडे, दर्शन बोर्डे, यांनी मार्गदर्शन केले. खेळाडूंच्या यशाबद्दल जिल्हा संघटनेचे अध्यक्ष आणि राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष शिवाजी राजेजाधव, उपाध्यक्ष मयूर बाहेर, युवराज भुसारी, सचिव शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त शेषनारायण लोढे, नितीन जेऊघाले, श्रीराम निळे, शुभम सुरडकर, गजेंद्र देशमुख बाळकृष्ण जाधव, गजानन देशमुख यांनी अभिनंदन केले.