
- पुण्यात २ नोव्हेंबर रोजी सर्वसाधारण सभा व निवडणूक होणार
- २२ राज्य क्रीडा संघटना मतदानासाठी पात्र
पुणे ः महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि निवडणूक २ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. ही सभा व निवडणूक पुण्यातील रॉयल बोट क्लब या ठिकाणी होणार आहे.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर यांनी संघटनेच्या अध्यक्षांच्या परवानगीने सभा व निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनला संलग्न असलेल्या प्रत्येक राज्य संघटनेचे दोन प्रतिनिधी आणि सहयोगी म्हणून मान्यता असलेल्या प्रत्येक राज्य संघटनेचा एक प्रतिनिधी या सभेस हजर राहू शकतात. या सर्वसाधारण सभेस हजर राहणाऱया आपल्या दोन-एक प्रतिनिधींची नावे (फोटोसहित) लेटरहेडवर व सोबत जोडलेल्या फॉर्म ए (प्रतिनिधी अर्ज) मध्ये संबंधित राज्य संघटनेच्या अध्यक्ष व सचिव यांच्या सही व शिक्यासहित महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यालयात ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोहचतील या बेताने पाठवावेत. झेरॉक्स कॉपी अर्ज स्वीकारला जाणार आहे. तसेच त्यानंतर आलेल्या अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही असे या पत्रकात नमूद करण्यात आलेले आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभेचे विषय
१.सन २०२५ ते २०२९ या चार वर्षांच्या कालावधीसाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या घटनेनुसार पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांची निवड करणे.
२. २९ मार्च २०२५ रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे या ठिकाणी संपन्न झालेल्या सन २०२३-२४ सालच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम करणे.
३. कार्यकारिणी मंडळाने शिफारस केलेले सन २०२४-२५ सालचे लेखाविवरणपत्र व ताळेबंदपत्र वाचून त्यास मंजूरी देणे.
४. कार्यकारिणी मंडळाने शिफारस केलेल्या सन २०२५-२६ सालच्या अंदाजपत्रकास मंजूरी देणे.
५. २०२५-२६ सालासाठी लेखापाल यांची नियुक्ती करणे.
६. २०२५ ते २०२९ या चार वर्षांच्या कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर करणे.
७. महाराष्ट्र राज्य क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत चर्चा करून निर्णय घेणे.
८. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनला प्राप्त झालेल्या विविध क्रीडा संघटनांच्या प्रस्ताव बाबत तक्रार निवारण व छाननी समितीने केलेल्या शिफारस व अहवालावर चर्चा करुन निर्णय घेणे.
९. अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळचे विषय.
निवडणुकीसाठी महत्त्वाच्या सूचना
१.महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांच्या निवडणुकीसाठी ज्या संलग्न राज्य क्रीडा संघटनेच्या प्रतिनिधीला अर्ज भरावयाचा आहे त्यांनी सोबत जोडलेल्या ए व बी फॉर्म व्यवस्थित भरुन त्यावर अध्यक्ष व सचिव यांची सही व संघटनेचा शिक्का घेणे आवश्यक आहे.
२. राज्य संघटनेस दोन प्रतिनिधी पाठवण्याचा अधिकार आहे व हे दोन्ही प्रतिनिधी त्या राज्य संघटनेच्या कार्यकारिणी समितीचे सभासद असणे अनिवार्य आहे. अशा दोन प्रतिनिधींमध्ये शक्य असेल तर एक महिला प्रतिनिधी असावी आणि प्रत्येक प्रतिनिधीस एक मत देण्याचा अधिकार आहे.
३. सहयोगी संघटनांना एक प्रतिनिधी पाठवण्याचा अधिकार असेल. परंतु, सदर प्रतिनिधीस मतदानाचा अधिकार नसेल.
४. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या मतदानास पात्र असलेल्या अधिकृत राज्य क्रीडा संघटनांची प्राथमिक यादी सोबत जोडली आहे व यादीबाबत आक्षेप असल्यास विहित मुदतीत आक्षेप नोंदवावा.

मतदानास पात्र असलेल्या अधिकृत राज्य संघटना
१.महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशन, २. महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन, ३. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन, ४. महाराष्ट्र स्टेट बास्केटबॉल असोसिएशन, ५. द वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन, ६. महाराष्ट्र अॅमॅच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशन, ७. हॉकी महाराष्ट्र, ८. महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन, ९. महाराष्ट्र खो-खो असोसिएशन, १०. महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशन, ११. महाराष्ट्र रायफल असोसिएशन, १२. महाराष्ट्र रोईंग असोसिएशन, १३, महाराष्ट्र स्टेट टेबल टेनिस असोसिएशन, १४. महाराष्ट्र ट्रायथलॉन असोसिएशन, १५. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, १६. महाराष्ट्र व्हॉलिबॉल असोसिएशन, १७. महाराष्ट्र स्टेट वेटलिफ्टिंग असोसिएशन, १८. महाराष्ट्र असोसिएशन फॉर कॅनोईंग अँड कयाकिंग, १९. महाराष्ट्र स्टेट फेन्सिंग असोसिएशन, २०. ऑल महाराष्ट्र वुशु असोसिएशन, २१. मॉडर्न पेन्टॉथलॉन असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, २२. रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र.