
धाराशिव ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व धाराशिव जिल्हा स्क्वाॅश रॅकेट असोसिएशन यांच्या वतीने आयोजित शालेय स्क्वॉश रॅकेट स्पर्धेला शानदार प्रारंभ झाला आहे.
श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय शालेय स्क्वाॅश रॅकेट स्पर्धेचे उद्घाटन महिला व बालकल्याण अधिकारी किशोर गोरे, विस्तार अधिकारी किशोर माळी, आणि संघटनेचे सचिव डॉ महेश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका क्रीडा अधिकारी गणेश पवार, क्रीडा अधिकारी अक्षय बिराजदार, विश्वास खांदारे, कुलदीप सावंत, योगेश थोरबोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून विविध वयोगटात ७० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेसाठी पंच म्हणून राजाभाऊ शिंदे, मुकुंद नांगरे, महादेव बोंदर, बालाजी पवार, प्रवीण तांबडे, माऊली भुतेकर यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजभाऊ शिंदे यांनी केले.