
छत्रपती संभाजीनगर ः लातूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत नॅशनल मेडलिस्ट व अष्टपैलू खेळाडू शेख हम्माद अली याने शानदार कामगिरी नोंदवत सुवर्ण पदक पटकावले.
महाराष्ट्र राज्य थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप लातूर येथील इनडोअर हॉल क्रीडा संकुल येथे झाली. डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये नागपूर, रायगड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, जळगाव, लातूर, नांदेड, पिंपरी चिंचवड, बीड, जालना या जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत शेख हम्माद अली याने अष्टपैलू कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले. लातूरच्या खेळाडूसोबत त्याचा अटीतटीचा सामना झाला. यात हम्माद याने विजय नोंदवला आणि आणखी एक सुवर्ण पदक जिंकले आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला चौथे स्थान मिळवून दिले.
येत्या ७, ८, ९ नोव्हेंबर या कालावधीत पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय थाईबॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी शेख हम्माद अली याने महाराष्ट्र संघात आपले स्थान पक्के केले आहे. त्याच्या या चमकदार कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य थाई बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष नबीजी फरहान व सचिव जमीर शिकलगर यांनी त्याचे अभिनंदन केले.
शेख हम्माद अलीच्या अष्टपैलू खेळीमुळे झेड एस वॉरियर्स अकॅडमीचे अध्यक्ष सय्यद जहूर अली, सचिव सय्यद रिजवान, प्रशिक्षक अजिंक्य विजय नितनवरे तसेच न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर सुम्मया मॅडम, मुख्याध्यापिका नखिया मॅडम, अल फरहाद वेलफेअर अँड एज्युकेशन सोसायटीचे सचिव अब्दुल मुकित अली यांच्यासह सचिव फरहत समरीन मॅडम यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.