
स्वरा, सार्थक, अध्या यांची राज्य स्पर्धेसाठी निवड
रत्नागिरी ः कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कोल्हापूर विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरी येथील खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावत घवगवीत यश संपादन केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर, जय किसान तरुण मंडळ, वडणगे यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या शालेय स्पर्धेमध्ये रत्नागिरी तालुक्यातील तायक्वांदो क्लबच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवून ३ सुवर्ण आणि ५ कांस्य अशी आठ पदकांची कमाई केली आहे.
पदक विजेते खेळाडूस्वरा साखरकर, सार्थक चव्हाण, अध्या कवितके यांनी सुवर्णपदक पटकावले. तसेच मृण्मयी वांगणकर, यज्ञा चव्हाण, मृदुला पाटील, त्रिशा मयेकर, गौरी विलणकर यांनी कांस्य पदक संपादन केले. सुवर्णपदक खेळाडूंची छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या सर्व खेळाडूंना तायक्वांदो प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच आराध्या प्रशांत मकवाना व शाहरुख शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
खेळाडूंच्या या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, तालुका क्रीडा अधिकारी गणेश जगताप, तालुका समन्वयक विनोद मयेकर, महाराष्ट्र राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष व्यंकटेशराव कररा, जिल्हा उपाध्यक्ष विश्वास लोखंडे, खजिनदार शशांक घडशी, सचिव लक्ष्मण कररा, तायक्वांदो प्रशिक्षक मिलिंद भागवत, मुख्याध्यापक, पालक, क्रीडा शिक्षक, संस्थेचे संचालक, तायक्वांदो क्लबचे सर्व पदाधिकारी, पालक यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.