मुंबई ः वरिष्ठ नागरिक कॅरम क्लब शिवाजी पार्क यांच्यावतीने वरिष्ठ नागरिकांसाठी प्रथमच कॅरम प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजी पार्क येथील आजी आजोबा उद्यानातील हॉलमध्ये ही स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.
या स्पर्धेत ८० खेळाडूंनी भाग घेतला त्यांचे १० संघात विभाजन करण्यात आले होते. अतिशय उत्साही वातावरणात या वरिष्ठ खेळाडूंनी स्पर्धेचा मनमुराद आनंद घेतला. अंतिम सामन्यात दर्शन मोरे संघाने रमेश ठाकूर संघास ४-२ असे हरवून लीगचे विजेतेपद पटकावले. आजी आजोबा संकल्पना राबविणारे व या उपक्रमास सुरुवातीपासून सहाय्य करणारे स्थानिक माजी आमदार सदा सरवणकर यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित असलेले ज्येष्ठ आंतर राष्ट्रीय कॅरमपटू महेंद्र तांबे यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. तर सदा सरवणकर यांनी सुरु केलेल्या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत असल्याने समाधान व्यक्त केले.
अंतिम फेरीत दर्शन मोरे संघाने रमेश ठाकूर संघाचा ४-२ असा पराभव करुन विजेतेपद पटकावले. यात विजय शेरला, दिलीप नार्वेकर, प्रीती जावकर, सुनील पवार, डी. सावंत यांनी अनुक्रमे नारायम वेमुला, वासुदेव कट्टा, ज्योत्स्ना गोखले, शैलेश म्हात्रे, शिवानंद भाये यांचा पराभव केला. दर्शन मोरे आणि शशांक प्रधान यांना शैलेश म्हात्रे व रमेश पाटणकर यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. तसेच प्रीती जावकर व वैगुडे यांना ज्योत्स्ना गोखले व रमेश ठाकूर यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.