शालेय डॉजबॉल स्पर्धेत दमाणी प्रशालेस दुहेरी मुकुट

  • By admin
  • September 18, 2025
  • 0
  • 13 Views
Spread the love

दोन्ही संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड

सोलापूर ः शालेय डॉजबॉल स्पर्धेत येथील बी एफ दमाणी प्रशालेच्या १७ वर्षांखालील मुले व मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. या दोन्ही संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

राजीव गांधी इनडोअर स्टेडियम येथे झालेल्या या स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलांच्या व मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक संपादन केला. यशस्वी खेळाडूंचे व प्रशिक्षक पवन भोसले यांचे संस्थेचे स्थानिक अध्यक्ष कालिदास जाजू, सचिवा मंगल काबरा , मुख्याध्यापिका रेखा पेंबर्ती, पर्यवेक्षक राहुल इंगळे आदींनी अभिनंदन केले.

विजेते संघ

१७ वर्षाखालील मुले ः अनिकेत तोळनूर, मुजीब शेख, रमेश शदे, संकेत गावडे, धर्मराज गणेशारी, आर्यन रोहीटे, यश क्षीरसागर, सोहम शदे,पार्थ सोलंकर, श्रीरंग पवार, सिद्धेश इंडी व सिद्धेश्वर कोलार.

मुलींचा विजेता संघ ः वैष्णवी नागणे, अदिती क्षीरसागर, सई पाटील, आर्या लंबाटे, श्रेया बरगंडे, श्रीहर्षा द्यावनपल्ली, सृष्टी गवळी, ज्ञानदा शिरवाळ, प्रांजली कोरे, सिद्धी उमाप, मनश्री होमकर, अनुष्का काळे.

अंडर १९ मुलांचा संघ ः अथर्व बारसे, श्रेयस घोडके, समर्थ सोनवणे, करण झिपरे, स्वानंद मुळे, आयुष तळभंडारे, वर्धन दरगड, युगंधर ननवरे, तेजस गादे, अनुष रोहिटे, रुद्राक्ष नागमोती व प्रणित मेहता.

१९ वयोगट मुली ः अनुष्का हिबारे, अर्पिता लखोटिया, ईश्वरी घटोळे, सौंदर्या हुच्चे, प्रिया मेहता, समृद्धी उळागड्डे, अभिरा कांबळे, स्वानंदी ताटे, राजमंजुश्री शदे, स्मिता निकते, कृपा निकते, आयुषा खंडेलवाल. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *