
१५ सुवर्णपदकांसह एकूण ४३ पदकांची कमाई
मुंबई ः अंधेरी येथे संपन्न झालेल्या आशिया कप आंतरराष्ट्रीय ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत शितोरियू स्पोर्ट्स कराटे अँड किक बॉक्सिंग असोसिएशनच्या खेळाडूंनी अभूतपूर्व कामगिरी करत तब्बल १५ सुवर्ण, ११ रौप्य आणि १७ कांस्य पदकं अशी एकूण ४३ पदकांची कमाई केली. या दणदणीत यशामुळे असोसिएशनने चॅम्पियनशिप ट्रॉफीवर आपला ठसा उमटवला.
या शानदार विजयानिमित्त ओएलपीएस हायस्कूल (चेंबूर), पीपल वेल्फेअर स्कूल (सायन), अवर लेडी ऑफ गुड कॉऊंसेल हायस्कूल (सायन), महाराष्ट्र सेवा मंडळ (गणेश गल्ली), हनुमान सेवा मंडळ (काळाकिल्ला) या शाळा व संस्थांच्या प्रशिक्षण वर्गांचा उल्लेखनीय सहभाग राहिला. खेळाडूंना प्रशिक्षक उमेश मुरकर, विघ्नेश मुरकर व आशिष महाडिक यांचे मार्गदर्शन लाभले आहे. गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्टने प्रशिक्षण व तयारीसाठी मोलाचे सहाय्य केले.
या शानदार विजयानंतर महाराष्ट्रातील कराटेपटूंचा आत्मविश्वास दुणावला असून, पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आणखी मोठे यश संपादन करण्याचा निर्धार खेळाडूंनी व्यक्त केला आहे.
पदक विजेते खेळाडू
सुवर्णपदक ः विन्स पाटील (२ सुवर्ण), अश्विनी जांबळे (२ सुवर्ण), ग्रीशम पटवर्धन (२ सुवर्ण), माहिरा तळेकर (२ सुवर्ण), काशिश जैस्वार (सुवर्ण, रौप्य), तेजस सकपाल (सुवर्ण, कांस्य), प्रियांश नंदी (सुवर्ण, कांस्य), अभिनीत दिवेकर (सुवर्ण, कांस्य), रियांश पटवर्धन (सुवर्ण), रोशन सेटी (सुवर्ण), राजीव राजेश (सुवर्ण).
रौप्यपदक ः सनिधी कारंडे (२ रौप्य), देवांश झा (२ रौप्य), तिशा कुबाडिया (रौप्य, कांस्य), क्षितिजा हांडा (रौप्य, कांस्य), नंदराज कराळे (रौप्य, कांस्य), पार्थ जोगळे (रौप्य, कांस्य), शिद्धत गुप्ता (रौप्य), स्वराज मोरे (रौप्य).
कांस्यपदक ः हितांशु कुडे (२ कांस्य), यथार्थ बुडमाला, सय्यद अहमद, ख्रिस देवडीगा, माहि पायेलकर, सान्वी कारंडे, मंजरी खिडबिडे, झिदान खान, कृतिका शुक्ला, विपश्चित तांबे.