पुणे : पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पुणे शहर बॉक्सिंग संघटनेच्या सहकार्याने आंतरशालेय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
१७ वर्षाखालील मुले व मुलींसाठी ही स्पर्धा २० व २१ सप्टेंबर रोजी जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम, भवानी पेठ, पुणे येथे पार पडणार आहे. या स्पर्धेत पुणे शहरातील अनेक प्रतिभावान खेळाडू मोठ्या उत्साहाने सहभागी होणार असून, त्यांच्या खेळ कौशल्याला वाव मिळणार आहे. अधिक माहितीसाठी विजय गुजर, सचिव, पुणे शहर बॉक्सिंग संघटना (९३२६१५३२४३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक अविनाश बागवे यांनी केले आहे.