
रायगड ः आंतर शालेय तायक्वांदो स्पर्धेत श्री नारायण गुरु इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.
जिल्हा क्रीडा परिषद रायगड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल यांच्या वतीने महात्मा एज्युकेशन सोसायटीचे पिल्लई एचओसीएल स्कूल, आणि ॲमेच्युअर तायक्वांदो असोसिएशन ऑफ रायगड यांच्या सहकार्याने रायगड जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धा आयोजित केली होती आणि ही स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत श्री नारायण गुरु इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत एकूण ५ पदके पटकावली.
सुवर्णपदक विजेत्या सर्व खेळाडूंनी मुंबई विभागीय तायक्वांदो शालेय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा २२ व २३ सप्टेंबर रोजी होणार आहे. या यशामध्ये शाळेचे क्रीडा शिक्षक रोहित तानाजी सिनलकर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. मुख्याध्यापिका डॉ देबोलीना रॉय, शिक्षकवृंद व पालकांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
पदक विजेते विद्यार्थी
सुवर्णपदक ः देव पवार (४८ किलो), भाग्यश्री पडीयाची (५५ किलो), तन्वी पानसरे (६८ किलो)
रौप्यपदक ः तनिष्का जैन (३८ किलो).
कांस्यपदक ः समर्थ साखरे (३५ किलो)