छत्रपती संभाजीनगर ः मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ब्लिट्झ चेस चॅलेंज छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्वात तरुण म्हणजे अवघ्या ५ वर्षांचा खेळाडू वल्लभ कुलकर्णी याने सर्व वयोगटातील खेळाडूंना दिला होता. यात २० खेळाडूंनी वल्लभने दिलेले आव्हान स्वीकारले.
छत्रपती संभाजीनगरच्या प्रतिष्ठित सोसायटी माय वर्ल्ड या ठिकाणी या आव्हानाचे समर्थन आणि आयोजन केले होते. वल्लभ आणि इतर खेळाडूंमध्ये एकूण २० सामने खेळले गेले. सर्व सामने चुरशीचे झाले. या प्रसंगी प्रख्यात बांधकाम व्यावसायिक नवीन बगडिया, रामा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
लिटिल माय वर्ल्ड्स वल्लभने २० पैकी १२ सामने जिंकले आणि दोन सामन्यांमध्ये बरोबरी साधली आणि ६ सामने गमावले. माय वर्ल्ड माय प्राईडचे नवीन बगडिया आणि माय वर्ल्ड्स फ्लॅट ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष चक्रधर दळवी, सचिव रामा शिंदे, नाथ किड्स स्कूलच्या प्राचार्या कवडे आणि प्रवीण विप्र आणि ऑल माय वर्ल्ड्स रेसिडेंट यांनी त्याच्या खेळाचे कौतुक केले आणि त्याच्या भविष्यातील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.



