छत्रपती संभाजीनगर ः लातूर येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य थाई बॉक्सिंग स्पर्धेमध्ये शेख जोहेब याने शानदार कामगिरी नोंदवत सुवर्णपदक पटकावले.
महाराष्ट्र राज्य थाई बॉक्सिंग स्पर्धा ही लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल येथे पार पडली. या स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून डॉ अर्चनाताई चाकूरकर या उपस्थित होत्या. या स्पर्धेत महाराष्ट्रातून १५ जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेत शेख जोहेब याचा अंतिम सामना मालेगावचा खेळाडू शेख गणी याच्यासोबत झाला आणि या सामन्यात शेख जोहेब याने विजय नोंदवला आणि सुवर्णपदक पटकावले.
या सुवर्ण कामगिरीमुळे आगामी ७ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय थाई बॉक्सिंग स्पर्धेमध्ये त्याची निवड झाली आहे. या कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य थाई बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष नबी फरान, सचिव जमीर शिकलगर व सहसचिव अब्रार खान तसेच एस वाय वुशु मार्शल आर्ट अकॅडमीचे संस्थापक व अध्यक्ष सय्यद सद्दाम व प्रशिक्षक सय्यद रिजवान यांनी अभिनंदन केले आहे. शेख जोहेब हा एस वाय वुशु मार्शल आर्ट अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे.


