
नवी दिल्ली : भारतीय संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाच्या स्फोटक आणि ऐतिहासिक शतकानंतरही भारतीय महिला संघाला तिसऱ्या दिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाकडून ४३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि भारताने मिळून या सामन्यात धावांचा विश्वविक्रम केला. महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले जेव्हा दोन्ही संघांनी एकत्रितपणे ७०० पेक्षा जास्त धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ४१२ धावा केल्या, तर भारताने प्रत्युत्तरात ३६९ धावा केल्या. या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून एकूण ७८१ धावा केल्या.
पराभव पत्करूनही भारतीय महिला संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इतिहास रचला. महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावसंख्या उभारण्याचा विक्रम भारताने केला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदाच एखाद्या संघाने ३०० धावांचा टप्पा ओलांडला. या संदर्भात भारताने इंग्लंडचा विक्रम मोडला. २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडने ८ गडी बाद २९८ धावा केल्या होत्या. या सामन्यात भारताकडून स्मृती मानधनाने शानदार फलंदाजी केली. तिने ६३ चेंडूत १२५ धावा केल्या, ज्यात १७ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. हरमनप्रीत कौरने ५२ धावा केल्या आणि दीप्ती शर्माने ७२ धावा केल्या.
टीम इंडियाने मालिका २-१ ने गमावली
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ४१३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताचा डाव ४७ षटकांत ३६९ धावांवर संपला. या पराभवामुळे भारताला केवळ सामनाच नाही तर मालिकाही १-२ अशी गमवावी लागली. भारतीय महिला संघ आता ३० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात खेळताना दिसेल.