
सचिव भिकन अंबे यांची माहिती
छत्रपती संभाजीनगर ः रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया, रोलर रिले स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी येथे ३ ते ५ ऑक्टोबर या कालावधीत इंटरनॅशनल रिले स्केटिंग सिलेक्शनचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संस्थापक व सचिव भिकन अंबे यांनी दिली.
या स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना संस्थापक सचिव भिकन अंबे म्हणाले की, शिर्डी येथे ३ ते ५ ऑक्टोबर या दरम्यान ४५वी ऑल इंडिया रोलर रिले स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय रोलर रिले स्केटिंग चॅम्पियनशिपसाठी भारताचा संघ निवडला जाणार आहे. त्यामुळे या स्पर्धेला महत्व प्राप्त झाले आहे. या स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी ९४२२२०३३१९, ९१६८४३०००० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन भिकन अंबे यांनी केले आहे.