
मुंबई ः पॉवरलिफ्टिंग सबर्बन मुंबई असोसिएशन यांच्या माध्यमातून डी एन नगर, अंधेरी येथे बेंच प्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ग्रेस फिटनेस सेंटर मधून अनेक स्पर्धकांनी सहभाग घेऊन उल्लेखनीय यश संपादन केले.
प्रशिक्षक बिनोद पात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धकांनी दमदार कामगिरी केली. यात आशा वाघेला (रौप्य), मानसी नाईक (सुवर्ण), उर्मिला यादव (सुवर्ण), दिपनीता नायक (सुवर्ण), भाग्यश्री सोलंकी (सुवर्ण), नेहा खातून (रौप्य), इमरान खान (सुवर्ण), सौरभ मिश्रा (रौप्य) व सुरोजीत झा (रौप्य) यांनी पदकांची कमाई करुन घवघवीत यश संपादन केले. या शानदार कामगिरीबद्दल ग्रेस फिटनेस सेंटर परिवारातर्फे सर्व विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले.