
छत्रपती संभाजीनगर ः तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत देवगिरी ग्लोबल अकॅडमी संघाने विजेतेपद पटकावले. या कामगिरीमुळे देवगिरी ग्लोबल अकॅडमी संघ जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
विनायकराव पाटील महाविद्यालय (वैजापूर) येथे घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये देवगिरी ग्लोबल अकॅडमी वैजापूर शाळेतील १४ वर्ष वयोगटाखालील खेळाडूंनी आरोहन अकॅडमी वैजापूर येथील संघावर मात करून प्रथम क्रमांक पटकावला. या विजेतेपदामुळे त्यांची जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली.
या शानदार कामगिरीबद्दल मॅनेजिंग डायरेक्टर देवदत्त पवार, प्राचार्य शिल्पा वर्मा, क्रीडा शिक्षक उषा अंभोरे, शेख अजहर व गीता वेळंजकर व कृष्णा सर आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.