मुंबई : मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनची ४२ व ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या रविवारी (२८ सप्टेंबर) सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आली आहे.
श्री लोकमान्य सेवा संघ (टिळक मंदिर), राम मंदिर रोड, विलेपार्ले, मुंबई – ४०००५७ येथे होणाऱ्या या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तीकर असतील. या सभेत इतिवृतास मंजुरी, वार्षिक जमाखर्च व वार्षिक अहवाल त्याच बरोबर संघटनेच्या इतर निर्णयावर साधक-बाधक चर्चा करून निर्णय घेण्यात येतील.
या वार्षिक सभेचे अहवाल व सभेची सूचना सर्व संलग्न संस्थांना मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तरी देखील २०२४ – २५ अखेरपर्यंत वार्षिक वर्गणी भरलेल्या संलग्न संस्थांना हा अहवाल अद्याप मिळाला नसेल त्यांनी रविवार व सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळता तो सायंकाळी ६-३० ते ८-३० या वेळेत जिल्हा संघटनेच्या कुर्ला – नेहरू नगर येथील कार्यालयातून घेऊन जावे. असे आवाहन एका पत्रकाद्वारे जिल्हा संघटनेचे सचिव राजेश पडेलकर यांनी केले आहे.