ठाणे महानगरपालिका शालेय कबड्डी स्पर्धेला उत्साहपूर्ण सुरुवात

  • By admin
  • September 22, 2025
  • 0
  • 14 Views
Spread the love

ठाणे (विष्णू माळी) ः पावसाच्या सरींमध्येही खेळाडूंच्या जोशात कोणतीही कमतरता दिसली नाही. सोमवारी सचिन तेंडुलकर क्रीडा संकुल, सावरकर नगर, ठाणे येथे आंतरशालेय ठाणे महानगरपालिका जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली.

या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुली व १७ वर्षांखालील मुलींच्या गटातील सामने रंगले. कबड्डी म्हटलं की खेळाडूंचा दमदार आवाज, जोश आणि मातीचा सुगंध यांचं एक वेगळं नातं आहे. त्याचं सुंदर दर्शन आज या स्पर्धेत घडले. खेळाडूंच्या उपस्थितीने सचिन तेंडुलकर क्रीडा संकुल खचाखच भरलेले दिसले. विशेष म्हणजे, दोन्ही वयोगटांमध्ये मिळून तब्बल ७० संघांनी सहभाग नोंदवला आणि स्पर्धेला ऐतिहासिक रंगत आणली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद वाघमोडे उपस्थित होते. यावेळी ठाणे मनपा क्षेत्र क्रीडा समन्वयक शंकर बरकडे, मनपा ठाणे क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष रणजीत शिंदे, ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक सतीश जाधव, जिल्हा संघटक व कबड्डी स्पर्धा प्रमुख ठोंबरे, कबड्डी प्रमुख डॉली मॅडम, विशाल, सतीश पाटील, जिल्हा संघटनेचे कार्यालयीन सचिव राजेंद्र पवार, साबणे, तसेच विविध शाळांचे क्रीडा शिक्षक मान्यवर उपस्थित राहून स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सर्व मान्यवरांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत स्पर्धेद्वारे संघ भावना, क्रीडा भावना आणि शिस्त यांचे महत्त्व अधोरेखित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *