कन्नड शालेय व्हॉलिबॉल स्पर्धेत कृष्णा स्कूलला दुहेरी मुकुट 

  • By admin
  • September 22, 2025
  • 0
  • 27 Views
Spread the love

कन्नड (प्रवीण शिंदे) ः कन्नड तालुकास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेत कृष्णा इंटरनॅशनल स्कूल संघाने १४ वर्षांखालील मुले व मुलींच्या गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. 

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि कृष्णा इंटरनॅशनल स्कूल कन्नड यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धा मोठ्या थाटामाटात संपन्न झाली. स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी छत्रपती संभाजीनगर व्हॉलिबॉल संघटनेचे सदस्य व मार्गदर्शक प्रवीण शिंदे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. कृष्णा इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष सचिन पवार हे उपस्थित होते. त्यांनी खेळ आणि खेळाचे महत्व विषद केले, 
प्रवीण शिंदे यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे म्हटले. संयोजक मुक्तानंद गोस्वामी यांनी आतापर्यंत सर्व खेळाच्या स्पर्धा पारदर्शक व नियमानुसार घेतल्याचे सांगितले.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा मार्गदर्शक अविनाश काळे, राकेश निकम, करण राठोड, रविकुमार सोनकांबळे, कडुबा चव्हाण, राहुल दणके, मुख्य पंच विशाल दांडेकर, एजाज शहा यांनी विशेष परिश्रम घेतले.

स्पर्धेचा अंतिम निकाल 

१४ वयोगट मुले ः १. कृष्णा इंटरनॅशनल स्कूल कन्नड, २. साने गुरुजी विद्यालय कन्नड. १४ वयोगट मुली ः १. कृष्णा इंटरनॅशनल स्कूल कन्नड, २. गौताळा व्हॅली स्कूल कन्नड.

१७ वयोगट मुले ः १. अली अलाना माध्यमिक विद्यालय कुंजखेडा, २. फातेमा कॉन्हेंट हायस्कूल कन्नड. १७ वयोगट मुली ः १. साने गुरुजी विद्यालय कन्नड, २. श्री गणेश विद्यालय देवगांव (रं).

१९ वयोगट मुले ः १. श्री गणेश विद्यालय देवगांव (रं), २. अली अलाना माध्यमिक विद्यालय कुंजखेडा. १९ वयोगट मुली ः १. मदर गंगा इंग्लिश स्कूल कन्नड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *