
आयुष कोल्हे, समर्थ आव्हाळे, सोहम आव्हाळेला सुवर्णपदक
छत्रपती संभाजीनगर ः अमरावती येथे संपन्न झालेल्या २९ व्या राज्यस्तरीय थांग-ता मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील सोहम इंग्लिश स्कूलच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी नोंदवत घवघवीत यश संपादन केले.
ऑल महाराष्ट्र थांग-ता असोसिएशन आयोजित २९ वी राज्यस्तरीय थांग-ता मार्शल आर्ट स्पर्धा अंबिका लॉन्स, ता. अचलपूर, जिल्हा अमरावती येथे यशस्वीरित्या संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये सातारा परिसरातील सोहम इंग्लिश स्कूल मधील खेळाडूंनी ३ सुवर्णपदक, १ रौप्य पदक आणि ७ कांस्य पदक प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले. तसेच गोवा राज्यात होणाऱ्या २९ व्या राष्ट्रीय थांग-ता मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये समर्थ आव्हाळे, आयुष कोल्हे, सोहम आव्हाळे या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धेत आयुष कोल्हे (सुवर्ण), समर्थ आव्हाळे (सुवर्ण), सोहम आव्हाळे (सुवर्ण), ओजस आव्हाळे (रौप्य), मोहम्मद बिलाल नदाफ (कांस्य), तनिष्क म्हस्के (कांस्य), संकल्प भंगाळे (कांस्य), भावेश राठोड (कांस्य), प्रद्युम्न गांधाले (कांस्य), आराध्या गरकल (कांस्य), स्वरा आव्हाळे (कांस्य) या खेळाडूंनी शानदार कामगिरी बजावत पदकांची कमाई केली. तसेच अबोली पठारे, वेदांत भुतेकर, स्वरुप पवार या खेळाडूंनी स्पर्धेत उत्तम कामगिरी नोंदवत लक्षवेधून घेतले.
या सर्व खेळाडूंना थांग-ता असोसिएशन महाराष्ट्राचे मुख्य प्रशिक्षक महावीर धुलधर व प्रशिक्षक प्रा प्रवीण आव्हाळे, सुनील डावकर, रामेश्वर चायल, संतोष आव्हाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच रुपाली जहागीरदार, सुवर्णा आव्हाळे, मनीष जहागीरदार, संदीप लघामे पाटील, सुनील मगर पाटील, प्रवीण राऊत, प्रा श्याम अंभोरे, अश्विनी बोजवारे, प्रीती वायकोस, सीमा नरवडे, पूजा औटे, किशोर आव्हाळे, संदीप आव्हाळे यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.