
धाराशिव ः धाराशिव शहराचे नवे वाहतूक निरीक्षक याहीया अहमद काझी यांचा क्रांतीसूर्य अण्णासाहेब पाटील सोशलवर्क कॉलेजतर्फे सत्कार करण्यात आला.
कॉलेजच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी धाराशिव आगार व्यवस्थापक बालाजी भांगे, संस्थेचे सचिव कुलदीप सावंत, प्राचार्य डॉ आर एम काझी, प्रा बापू बाराते, तात्यासाहेब रणखांब यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कारानंतर मनोगत व्यक्त करताना वाहतूक निरीक्षक काझी म्हणाले की, “कॉलेज परिवाराकडून झालेला माझा सन्मान माझ्यासाठी अभिमानाची व प्रेरणादायी घटना आहे. वाहतूक विभागात काम करताना शिस्त, सुरक्षितता व जनतेच्या सोयीसाठी एकत्रित प्रयत्न होणे गरजेचे आहे. या सत्कारामुळे माझ्या कार्यात नवी ऊर्जा मिळाली असून, मी सदैव कर्तव्यनिष्ठ राहून जनतेची सेवा करीन.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा बापू बाराते यांनी केले. प्राचार्य डॉ आर एम काझी यांनी आभार मानले.