मुंबई ः एम आय जी क्रिकेट क्लबच्या वतीने तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला २७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता एम आय जी क्रिकेट क्लब (वातानुकूलित हॉल), वांद्रे (पूर्व), मुंबई येथे सुरुवात होत आहे.
महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटना यांच्या मान्यतेने आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेत मुंबईच्या माजी विश्व् विजेत्या प्रशांत मोरे याला पुरुष गटात तर ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकर हिला महिला एकेरी गटात प्रथम मानांकन देण्यात आले आहे. ठाण्याच्या झैद अहमद फारुकी व रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने द्वितीय मानांकन प्राप्त केले आहे.
पुरुष एकेरी गटात ३१० व महिला एकेरी गटात ४४ कॅरमपटू सहभागी आहेत. मागील स्पर्धेपेक्षा यंदाच्या वर्षी जास्त खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले असल्यामुळे आयोजकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनेल वरून या स्पर्धेतील महत्वाच्या सामन्यांचे थेट प्रसारण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
पुरुष एकेरी मानांकन : १) प्रशांत मोरे (मुंबई), २) झैदी अहमद फारुकी (ठाणे), ३) विकास धारिया (मुंबई), ४) सागर वाघमारे (पुणे), ५) समीर अन्सारी (ठाणे), ६) महम्मद घुफ्रान (मुंबई), ७) प्रफुल मोरे (मुंबई), ८) अभिजित त्रिपनकर (पुणे).
महिला एकेरी मानांकन : १) समृद्धी घाडीगावकर (ठाणे), २) आकांक्षा कदम (रत्नागिरी), ३) मिताली पाठक (मुंबई), ४) प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर), ५) अंबिका हरिथ (मुंबई), ६) केशर निर्गुण (सिंधुदुर्ग), ७) नीलम घोडके (मुंबई), ऐशा साजिद खान (मुंबई).