ठाणे ः ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या रविवारी (२८ सप्टेंबर) सकाळी १०.३० वाजता श्री मावळी मंडळ सभागृह, चरई, ठाणे पश्चिम येथे आयोजित करण्यात आली आहे.
ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष कृष्णा पाटील हे सभेच्या अध्यक्षस्थानी असतील. या सभेची सूचना व वार्षिक अहवाल सर्व संलग्न संस्थांना पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अद्याप हा अहवाल चुकून एखाद्या संस्थेला मिळाला नसेल त्यांनी संघटनेच्या ठाणे येथील कार्यालयातून सायंकाळी सात ते नऊ या वेळेत घेऊन जावा. तसेच वेळेवर उपस्थित राहून जिल्हा संघटनेला सहकार्य करावे. असे आवाहन संघटनेचे सचिव मालोजी भोसले यांनी केले आहे.