
जळगाव ः रावेर येथील श्री व्ही एस नाईक महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला.
या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव विभागाचे सचिव प्रा सुभाष वानखेडे, स्पर्धा निवड समिती सदस्य डॉ गोविंद मारतळे, डॉ मुकेश पवार, जळगाव जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशनचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक योगेश महाजन, व्ही डी पाटील, डॉ बी जी मुख्यदल, डॉ नीता जाधव, प्रा सत्यशील धनले, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ उमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात माजी विद्यार्थी प्रणित महाजन याची सीआयएसएफ येथे निवड झाल्याबाबत आणि मनीष महाजन हा असेट एक्झाम पास झाल्याबाबत त्यांचा सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जळगाव जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशनचे अमोद महाजन, यशवंत महाजन, अविनाश महाजन, अजय महाजन, संदीप महाजन, विष्णू भोई, मनीष महाजन, प्रणित महाजन आदींनी पुढाकार घेतला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ उमेश पाटील यांनी केले. संदीप महाजन यांनी आभार मानले.