
मुंबई : मीरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्यातील १७ पैलवानांची निवड मुंबई विभागस्तरिय शालेय कुस्ती स्पर्धेकरिता करण्यात आलेली आहे.
ही जिल्हा शालेय कुस्ती स्पर्धा श्री गणेश आखाडा, भाईंदर येथे पार पडली. त्यामध्ये पन्नास पेक्षा जास्त पैलवानांचा सहभाग होता. पदक विजेत्यांना वस्ताद वसंतराव पाटील, वैभव माने यांचे मार्गदर्शन लाभले.
वरिष्ठ शिक्षक बलराज बागल यांच्या हस्ते वजनकाटा पूजन करून वजनाला सुरुवात करण्यात आली. मीरा भाईंदर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार मिलिंद लिमये यांच्या हस्ते आखाड्याचे पूजन करून कुस्ती स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
पुणे येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत श्री गणेश आखाड्याच्या ओम सुनील जाधवने ९७ किलो वजनी गटात तसेच अनिकेत यादव याने देखील वसई विरार महानगर पालिका क्षेत्रातील जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेत ७५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला. या दोघांची देखील निवड विभागस्तरावर होणाऱ्या कुस्ती स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. मुंबई विभागस्तरीय स्पर्धा कळंबोली पोलिस हेडकॉटर या ठिकाणी २९ सप्टेंबर रोजी संपन्न होणार आहेत.
सुवर्ण पदक विजेते कुस्तीपटू
१४ वयोगट मुले
स्वराज नितीन खाडे (३५ किलो), मयूर अनिल शेडगे (३८ किलो), प्रतीक रामचंद्र बोबडे (४१ किलो), दक्ष लखाराम चौधरी (४४ किलो), युवराज वेनीलाल माली (५७ किलो), स्पंदन किशोर पाटील (६८ किलो).
१४ वयोगट मुली
प्रिया ब्रिजेश गुप्ता (३३ किलो), अर्पिता चव्हाण (३९ किलो), तनुजा विनोद मांढरे (४२ किलो).
१७ वयोगट मुले
हरेकृष्ण मनोज तिखन (४५ किलो), साईनाथ गायकवाड (४५ किलो, रौप्य), महावीर रामधनी गुप्ता (४५ किलो, कांस्य), महेश उमाकांत ढगे (६५ किलो, सुवर्ण).
१७ वयोगट मुली
कविता विनोद राजभर (४६ किलो), स्नेहा कन्हैया गुप्ता (५३ किलो), सुप्रिया ब्रिजेश गुप्ता (५७ किलो), मनस्वी दिलीप राऊत (६१ किलो).
१९ वयोगट मुले
लकी अडबल्ले (६५ किलो), साजिद शेख (७० किलो).