 
            नागपूर ः रणजी ट्रॉफी विजेत्या विदर्भाचा कर्णधार म्हणून यष्टीरक्षक-फलंदाज अक्षय वाडकर याची निवड करण्यात आली. रेस्ट ऑफ इंडिया विरुद्ध विदर्भाचा सामना १ ऑक्टोबरपासून नागपूरमध्ये सुरू होईल. २०१७-१८ आणि २०१८-१९ हंगामानंतर तिसऱ्यांदा इराणी कप जिंकण्याचे विदर्भाचे लक्ष्य असेल. रेस्ट ऑफ इंडियाने हे प्रतिष्ठित विजेतेपद २९ वेळा जिंकले आहे.
विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ निवड समितीने बुधवारी बैठक घेतली आणि यश राठोडची उपकर्णधार म्हणून नियुक्ती केली. निवड समितीमध्ये सुधीर वानखेडे, पी विवेक आणि जयेश डोणगावकर यांचा समावेश आहे. २०२४-२५ रणजी ट्रॉफी हंगामात यश राठोड सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता, त्याने ९६० धावा केल्या. वाडकरने ६२ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४८.८२ च्या सरासरीने ११ शतकांसह ३९०६ धावा केल्या आहेत. गेल्या मोसमात विदर्भाच्या रणजी ट्रॉफी जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा उस्मान गनी संघाचे प्रशिक्षक असेल.
विदर्भ संघ
अक्षय वाडकर (कर्णधार आणि यष्टिरक्षक), यश राठोड, अथर्व तायडे, अमन मोखाडे, दानिश मालेवार, हर्ष दुबे, पार्थ रेखाडे, यश ठाकूर, नचिकेत भुते, दर्शन नळकांडे, आदित्य ठाकरे, अक्षय कर्णेवार, यश कदम, शिवम देशमुख, प्रफुल हिंगे, ध्रुव शोरे.



