
नागपूर ः कळमेश्वर येथे सार्वजनिक बांधकाम अंतर्गत नगरपरिषद शाळा क्रमांक ३ येथे ५८.३१ लक्ष रुपये किमतीच्या फुटसाल ग्राउंडचे लोकार्पण आमदार डॉ आशिषराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी मोठ्या प्रमाणात नागरिक, युवक, विद्यार्थी उपस्थित होते. फुटसाल ग्राउंडचा फायदा शहरातील नागरिकांना, विद्यार्थ्याना, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना होणार आहे. महत्वाचे म्हणजेच शहरामध्ये या प्रकारचे अत्याधुनिक सुविधा असलेले पहिलेच ग्राउंड ठरले आहे.
या प्रसंगी आमदार डॉ आशिष देशमुख यांनी शुभेच्छा देत या फुटसाल ग्राउंडचा फायदा शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य सुधारण्यासाठी जास्तीत जास्त संख्येनी घ्यावा असे आवाहन केले. आपण सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदार संघाला विकासाच्या दृष्टीने क्षेत्रात पुढे नेण्याचे प्रामाणिक प्रयत्न करू असे म्हटले.
या प्रसंगी प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ राजीव पोतदार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष भाजपा मनोहर कुंभारे, धनराज देवके, अजय खंडेलवाल, योगेंद्र खोब्रागडे, आकाश सुरळकर, तहसीलदार विकास बिक्कड, प्रमोद हत्ती, प्रतीक कोल्हे, मनीषा लंगडे, रुपाली चुनारकर, जयश्री पवार, अरुणा मंडलिक उपस्थित होते.