कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर 

  • By admin
  • September 25, 2025
  • 0
  • 31 Views
Spread the love

रवींद्र जडेजा उपकर्णधार, करुण नायरला वगळले 

मुंबई ः भारतीय संघ २ ऑक्टोबरपासून वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चौथ्या आवृत्तीत पुढील मालिका खेळेल. या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाची घोषणा आधीच करण्यात आली होती, तर बीसीसीआयने भारतीय संघ संघ गुरुवारी जाहीर केला आहे. शुभमन गिलचा कर्णधार म्हणून समावेश आहे, तर जसप्रीत बुमराहचा देखील समावेश आहे. करुण नायरला संघातून वगळण्यात आले आहे.

देवदत्त पडिक्कल याने संघात पुनरागमन केले असून यष्टीरक्षक फलंदाज नारायण जगदीसन याला संधी देण्यात आली आहे. डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कल संघात परतला आहे. त्याला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघातून वगळण्यात आले होते. दरम्यान, दीर्घकाळ अनुपस्थितीनंतर भारतीय कसोटी संघात परतलेला करुण नायर इंग्लंड दौऱ्यातील खराब कामगिरीमुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात समाविष्ट करण्यात आलेला नाही. इंग्लंड दौऱ्यादरम्यान दुखापत झालेला टीम इंडियाचा प्रमुख यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत अद्याप या मालिकेसाठी पूर्णपणे बरा झालेला नाही.

ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत, ओव्हल कसोटीच्या अगदी आधी भारतीय संघात समाविष्ट झालेल्या नारायण जगदीसनला दुसरा यष्टीरक्षक म्हणून निवडण्यात आले आहे. शिवाय, वेगवान गोलंदाज आकाश दीपलाही या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात समाविष्ट करण्यात आलेले नाही.

रवींद्र जडेजाची उपकर्णधार म्हणून नियुक्ती
टीम इंडियाचा अनुभवी स्पिन अष्टपैलू रवींद्र जडेजाची वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संघात वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचाही फिरकी गोलंदाज म्हणून समावेश आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांचाही समावेश आहे.

भारताचा कसोटी संघ
शुभमन गिल (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, नारायण जगदीशन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *