कालीमठ येथे शालेय कबड्डी स्पर्धेत ४७ मुलींच्या संघांचा सहभाग 

  • By admin
  • September 26, 2025
  • 0
  • 88 Views
Spread the love

कन्नड (प्रवीण शिंदे) ः कन्नड तालुका क्रीडा समिती व स्वामी प्रणवानंद सरस्वती हायस्कूल कालीमठ उपळा यांच्या सयुक्त विद्यमानाने आयोजित शालेय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन कालीमठ ट्रस्टचे सचिव सुचिताताई शिवाजी सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका क्रीडा संकुल समिती सदस्य व क्रीडा मार्गदर्शक प्रवीण शिंदे, तालुका क्रीडा संयोजक मुक्तानंद गोस्वामी, क्रीडा मार्गदर्शक अविनाश काळे तसेच स्वामी प्रणवानंद सरस्वती हायस्कूल कालीमठ शाळेचे मुख्याध्यापक हेमकांत पाटील व राज्य कुस्ती पंच विजयसिंह बरवाल, कबड्डीचे पंच कडूबा चव्हाण तसेच परिसरातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

मुलींच्या या स्पर्धेमध्ये एकूण ४७ शालेय संघांनी सहभाग नोंदवला. यावेळी पंच कडूबा चव्हाण, प्रशांत नवले, अरुण पवार, रवी कुमार सोनकांबळे, संदीप बागुल, किशोर गवळी, घरटे एस व्ही, देवरे पी आर, नवसरे एस एस, बुरकुल पी के, जाधव के एस, वेळीस एस ओ, पाटील के व्ही, देवरे व्ही के, देवरे भैय्यासाहेब यांनी अथक परिश्रम घेऊन स्पर्धा उत्साहात पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *