 
            विजेत्या खेळाडूंची विभागीय पातळीवर निवड
छत्रपती संभाजीनगर ः मनपा अंतर्गत शालेय जिल्हास्तरीय ज्यूदो स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा ज्यूदो संघटनेच्या सहकार्याने एन ३ किटली गार्डन, सिडको येथील ज्यूदो हॉलवर उत्साहात पार पडली.
या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य ज्यूदो संघटनेचे उपाध्यक्ष डॉ गणेश शेटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा संघटनेचे सचिव अतुल बामणोदकर, उपाध्यक्ष प्रसन्न पटवर्धन, भिमराज रहाणे, विश्वजित भावे, विश्वास जोशी, झिया अन्सारी, अशोक जंगमे, अमित साकला, मनिंदर बिलवाल आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेतून सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन राज्य संघटनेचे सचिव दत्ता आफळे, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अजित मुळे, उपाध्यक्ष दीप्ती शेवतेकर, प्रसन्ना पटवर्धन, भिमराज रहाणे, सचिव अतुल बामणोदकर, विश्वजित भावे, विश्वास जोशी, झिया अन्सारी, अशोक जंगमे, अमित साकला, कैलास थत्तेकर, मनिंदर बिलवाल, सुनील सिरस्वाल, दत्तू पवार, कुणाल गायकवाड आदी मान्यवरांनी केले. तसेच सर्व विजेत्यांना आगामी विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
सुवर्णपदक विजेते खेळाडू
मुले : प्रथमेश पवार, इंजमाम खान, आनंद शेळके, साई थत्तेकर, यशराज फड, कार्तिक राव, सुदर्शन चव्हाण, शेख सलमान, अब्दुल अहाद सिद्दीकी, मुजाहिद शेख, ध्रुव घाणेकर, मोहम्मद इब्राहिम.
मुली : सौम्या साकला, इफ्रा फलक शेख हमीद, अफिफा साहेर, संचित गायकवाड, वैष्णवी जोशी, मुस्कान शेख, आयेशा मिर्झा, आश्मी कापसे, अफिया शेख, सावनी पटवर्धन, अफिया खान, झुबिया कुरेशी, तृप्ती वाघमारे, स्वरदा बामणोदकर.



