
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर शहरातील जगदीश बंकटलाल अग्रवाल यांची राष्ट्रीय सह-प्रवक्तापदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जगदीश अग्रवाल यांनी यापूर्वी अखिल भारतीय युवा अग्रवाल संमेलन राष्ट्रीय युवा उपाध्यक्ष तसेच अखिल भारतीय अग्रवाल संमेलन महाराष्ट्र राज्य कमिटीचे उपाध्यक्ष म्हणून कार्य केले आहे. तसेच महाराष्ट्रात पुणे, जळगाव, देऊळगाव राजा अशा अनेक ठिकाणी जयंती निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आलेले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे अग्रवाल समाजामध्ये दोन वेळेस अग्रवाल युवा मंच अध्यक्ष व अग्रवाल सभाचे उपाध्यक्ष म्हणून कार्य केले आहे या सगळ्या गोष्टीला लक्षात घेऊन अखिल भारतीय अग्रवाल संमेलनचे राष्ट्रीय अध्यक्ष गोपाल शरणजी गर्ग यांनी मीटिंगमध्ये निर्णय घेऊन जगदीश अग्रवाल यांची नियुक्ती एका मताने केली आहे. यापुढे जगदीश अग्रवाल यांनी देशभरात व महाराष्ट्रात अग्रवाल समाजातील युवांना महिलांना जोडून अनेक कार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. समाजातील चांगला अनुभव असल्यामुळे सगळीकडे त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन होत आहे.