मुंबई रणजी संघाच्या कर्णधारपदी शार्दुल ठाकूर 

  • By admin
  • September 26, 2025
  • 0
  • 82 Views
Spread the love

मुंबई ः मुंबई रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी अष्टपैलू शार्दुल ठाकूरची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. 

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष संजय पाटील, रवी ठाकर, जितेंद्र ठाकरे, विक्रांत येलीगेटी आणि दीपक जाधव यांचा समावेश असलेल्या समिती सदस्यांनी संघाची निवड केली आहे. त्यांनी २०२५-२०२६ च्या रणजी ट्रॉफीसाठी संभाव्य खेळाडूंची निवड केली आहे.

मुंबईचा संभाव्य रणजी ट्रॉफी संघ 
शार्दुल ठाकूर (कर्णधार), आयुष म्हात्रे, मुशीर खान, अंगकृष्ण रघुवंशी, अखिल हेरवाडकर, अजिंक्य रहाणे, सरफराज खान, सिद्धेश लाड, सुवेद पारकर, सुर्यांश शेडगे, आकाश पारकर, तुषार देशपांडे, सिल्वेस्टर डिसोझा, इरफान उमैर, रॉयस्टन डायस, प्रतीक मिश्रा, आकाश आनंद (यष्टीरक्षक), हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), प्रसाद पवार (यष्टीरक्षक), शम्स मुलाणी, तनुष कोटियन, हिमांशू सिंग, अथर्व अंकोलेकर, इशान मुलचंदानी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *