
पुणे : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे विभागीय शालेय बॉक्सिंग (१७ वर्षे मुले व मुली) स्पर्धेचे जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम, भवानी पेठ, पुणे येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतून पुणे विभागाचा बॉक्सिंग संघ राज्य स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे व पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष भरतकुमार व्हावळ यांनी अलिबाग, रायगड येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य शालेय स्पर्धेकरिता पात्र झालेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
या विभागीय स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा, पुणे शहर, पिंपरी चिंचवड, अहिल्यानगर जिल्हा, अहिल्यानगर शहर, सोलापूर जिल्हा व सोलापूर शहर या ७ संघाचे खेळाडू सहभागी झाले होते. यातील विजेते खेळाडू अलिबाग, रायगड येथे होणाऱ्या राज्य शालेय स्पर्धेकरिता पात्र ठरले आहेत, असे पुणे जिल्हा संघटनेचे महासचिव अभिमन्यू सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकात सांगितले.
या प्रसंगी पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव विजय गुजर, उपाध्यक्ष अशोक मेमजादे व जीवनलाल निंदाने, पिंपरी-चिंचवड बॉक्सिंग संघटनेचे सचिव मनोज यादव, क्रीडा अधिकारी अश्विनी हत्तरगे, ज्येष्ठ राष्ट्रीय खेळाडू शेखर पुजारी, सुरेश गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयदीप गायकवाड, राष्ट्रीय बॉक्सर इकबाल शेख, आदी मान्यवर उपस्थित होते.
या विभागीय स्पर्धा यशस्वी करण्याकरिता अशोक मेमजादे, डॉ ओंकार कौले, अभिमान सूर्यवंशी, जीवनलाल निंदाणे, ऋषिकांत वचकळ, सनी परदेशी, मनोज यादव, आसिफ शेख, विनोद कुंजीर, चेतना वारे, संजय यादव, अमन शर्मा, कुणाल पालकर, प्रदीप वाघे, अमोल पिसे या पंचांसह योगेश क्षीरसागर, जीत गुजर यांनी विशेष भूमिका बजावली.
सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव विजय गुजर यांनी केले व पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे महासचिव अभिमन्यू सूर्यवंशी यांनी सर्व उपस्थित मान्यवर, खेळाडू, पंच, प्रशिक्षक, पालक यांचे सहकार्याबद्दल विशेष आभार मानले.
राज्य शालेय स्पर्धेकरिता निवड झालेले खेळाडू
१७ वर्षे मुले ः ॲलन राजमणी (पुणे शहर), कल्पेश बिका (पुणे शहर), शिवराजे कौले (पुणे जिल्हा), साद शेख (पुणे शहर), उदय घोरपडे (पुणे शहर), अरहंत सूर्यवंशी (पुणे शहर), राजवीर सूर्यवंशी (पुणे शहर), रोनक लोखंडे (पुणे शहर), आर्यन बोबडे (पुणे शहर), आयुष दातीर (पुणे शहर), श्रावण काळे (पुणे शहर), निश्चय जीनवाल (पिंपरी चिंचवड), इंद्रजीत रणवरे (पुणे जिल्हा).
१७ वर्षे मुली ः आर्या गार्डे (पुणे शहर), दीपाली थापा (पुणे शहर), वेदा शिंदे (पुणे शहर), आर्या पगारे (पुणे शहर), एकमप्रीत कौर (पुणे शहर), ममता राऊत (पुणे शहर), आर्या कोंडके (पुणे शहर), श्रद्धा चौधरी (पिंपरी चिंचवड), ओवी पवळे (पुणे शहर), अनुश्री पाटील (पुणे शहर), पूर्वा गाढवे (पुणे शहर), आयमान अन्सारी (पुणे शहर), स्वप्नाली सुरवसे (पिंपरी चिंचवड), तनिष्का लोखंडे (पिंपरी चिंचवड), भक्ती ननावरे (पुणे शहर).