
मुंबई ः एम आय जी क्रिकेट क्लब, वांद्रे येथे तिसऱ्या एम आय जी राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला सुरुवात झाली. पुरुष एकेरी गटाने सुरू झालेल्या या गटातील पहिल्या फेरीत मुंबईच्या भारत दांडेकरने मुंबई उपनगरच्या केवल कुलकर्णी याचा १६-११, २५-११ असा तर ठाण्याच्या दशरथ कदमने मुंबईच्या जयवंत मोरेला २२-२१, २५-० असे नमवुन दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
या स्पर्धेचे उद्घाटन एम आय जी स्पोर्ट्स क्लबचे इनडोअर सचिव निनाद बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जिमखान्याचे सचिव निशांत पाटणकर, इनडोअर समन्वयक व वित्त सचिव केदार कलबाग, कार्यकारिणी सदस्य सिद्धेश पारधे, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार, उपाध्यक्ष यतीन ठाकूर, खजिनदार अजित सावंत, सहसचिव केतन चिखले उपस्थित होते.
पुरुष एकेरी गटाचे पहिल्या फेरीचे निकाल
अनंत सुर्वे (मुंबई) विजयी विरुद्ध निलेश देवळेकर (मुंबई उपनगर), आशिष देशमाने (रायगड) विजयी विरुद्ध राकेश भामले (मुंबई), तृषांत कांबळी (मुंबई उपनगर) विजयी विरुद्ध महेश कुपेरकर (मुंबई), ओजस जाधव (मुंबई) विजयी विरुद्ध निखिल शिंगरे (मुंबई उपनगर), प्रशांत मोरे (मुंबई) विजयी विरुद्ध महम्मद असिफ अहमद खान (ठाणे), प्रेम खरार (मुंबई उपनगर) विजयी विरुद्ध लक्ष्मीनारायण बोपर्थी (मुंबई), प्रसन्न गोळे (मुंबई उपनगर) विजयी विरुद्ध वीर पाठारे (मुंबई), किरण भोपनीकर (मुंबई उपनगर) विजयी विरुद्ध शांतीलाल जीतिया (मुंबई), नीरज कांबळे (मुंबई) विजयी विरुद्ध पराग नाडकर्णी (मुंबई उपनगर), गिरीधर भोज (मुंबई उपनगर) विजयी विरुद्ध अजय मोहिते (मुंबई).