
नंदुरबार ः नंदुरबार तालुका विनायक समिती संचलित यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथील जलतरणपटूंनी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत आयोजित जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले आहे.
१७ वर्षे मुलांच्या गटात चार बाय शंभर मीटर रिले स्पर्धेत विद्यालयाच्या संघाने विजय मिळवला. या विजयी संघामध्ये गोरख पुण्या सोनवणे, करण रेल्या वाळवी, शेखर दिलीप वळवी व उदय उमेश गावित यांचा समावेश होता.
१९ वर्षे मुलांच्या गटात मानवत याने २०० मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तर ऋषीनाथ अरविंद प्रधान याने ५० मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.
या सर्व खेळाडूंची नाशिक येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून ते नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. खेळाडूंच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन चंद्रकांत रघुवंशी, उपाध्यक्ष मनोज रघुवंशी, सचिव यशवंत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शाळेचे प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी व पर्यवेक्षक विलास पाटील यांनी विजेत्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.