विद्यार्थी सुरक्षेला प्राधान्य देत शिक्षण परिषद संपन्न

  • By admin
  • September 28, 2025
  • 0
  • 85 Views
Spread the love

जलतरण साक्षरतेसह विविध शैक्षणिक उपक्रमांचा सखोल अभ्यासावर भर

छत्रपती संभाजीनगर ः गंगापूर तालुक्यातील अंबेलोहळ येथील जिल्हा परिषद प्रशालेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रीत करून “शिक्षण परिषद” संपन्न झाली.

परिषदेत गुणवत्ता पूर्ण शिक्षण, शालाबाह्य उपक्रम, व्यक्तिमत्व व कौशल्य विकास, आरोग्य व खेळ तसेच पालकांचा सहभाग या मुद्द्यांवर चर्चेसह मार्गदर्शन करण्यात आले. या परिषदेचे मुख्याध्यापक राजेश्वर दुम्मलवार यांनी हस्ते उद्घाटन झाले.

प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे, केंद्र प्रमुख गोरख काळवणे, केंद्रीय मुख्याध्यापक संतोष जगताप, मुख्याध्यापक सुनील जोशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांनी या परिषदेला मार्गदर्शन केले. परिषदेत शिक्षकांनी आपले परिचय देत शाळांमध्ये राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. तसेच, इतर शाळांमधील चांगले उपक्रम आपल्या शाळांमध्ये लागू करता येतील का, यावर विचारविनिमय झाला.

उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध राहण्याची शपथ घेतली.गोरख काळवणे यांनी अभ्यासक्रमातील नवीन बदल जाणून घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले, तर राजेश भोसले यांनी जलतरण साक्षरता राबविण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले.परिषदेत हरिभाऊ गांगर्डे यांनी सूत्रसंचालन केले, तर दिगंबर औसरमल यांनी आभार प्रदर्शन केले. उपस्थित महिला आणि पुरुष शिक्षकांचा उत्स्फुर्त सहभाग पाहून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशा व्यक्त केली गेली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *