
मुंबई ः एमआयजी क्रिकेट क्लबच्यावतीने वांद्रे, पूर्व येथे सुरू असलेल्या तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत निलांश चिपळूणकर, पंकज पवार राजेश गोहिल, दिलेश खेडेकर या नामांकित खेळाडूंनी आपापले सामने जिंकून चौथ्या फेरीत प्रवेश केला.
पुरुष एकेरी तिसऱ्या फेरीचे निकाल
नूर महम्मद शेख (मुंबई) विजयी विरुद्ध सुहास पोमेंडकर (मुंबई उपनगर) ९-२५, २५-६, २५-८, जितेश कदम (मुंबई उपनगर) विजयी विरुद्ध संतोष पुजारी (मुंबई) २५-०, २५-३, दिलेश खेडेकर (मुंबई) विजयी विरुद्ध सिद्धेश सावर्डेकर (मुंबई) २५-०, २५-१२, मंगेश पंडित (मुंबई उपनगर) विजयी विरुद्ध राहुल भस्मे (रत्नागिरी) २५-४, २०-१९, राजेश गोहिल (रायगड) विजयी विरुद्ध अनंत गायत्री (मुंबई) २५-०, २५-८, सार्थ मोरे (मुंबई) विजयी विरुद्ध हेमंत पांचाळ (मुंबई) १७-१५, २५-२४, शेख महम्मद रझा (मुंबई) विजयी विरुद्ध आशिष सिंग (मुंबई उपनगर) २३-१४, २५-१४, पंकज पवार (ठाणे) विजयी विरुद्ध साजिद जबरी (नांदेड) २५-११, २५-१, मिहीर शेख (मुंबई) विजयी विरुद्ध शाहबाझ शेख (मुंबई उपनगर) २५-११, ११-१५, २५-२३, महम्मद वाजिद पाशा (नांदेड) विजयी विरुद्ध नौशाद शेख (ठाणे) १६-१४, २५-१०, कुणाल राऊत (ठाणे) विजयी विरुद्ध अक्षय लाडगे (मुंबई) २५-१०, २५-८, निलांश चिपळूणकर (मुंबई) विजयी विरुद्ध विनायक वाकणकर (ठाणे) २५-७, २५-०.