
छत्रपती संभाजीनगर ः डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे आयोजित आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करून घवघवीत यश मिळवले आहे.
सिल्लोड येथील इंद्रराज महाविद्यालय येथे झालेल्या मल्लखांब स्पर्धेत बीपीएड अभ्यासक्रमाचा विद्यार्थी सार्थक खर्चन याने सुवर्णपदक पटकावले. तर, सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालय येथे झालेल्या रायफल शुटींग स्पर्धेत रोहन जाधव याने सुवर्ण तर धनंजय नागपुरे याने रौप्य आणि सागर फाटके याने कांस्य पदक जिंकले.
या घवघवीत यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच, महाविद्यालयाचे सर्व शैक्षणिक व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांच्या या कामगिरीचे कौतुक केले.