
२४४ खेळाडूंचा सहभाग
छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा मुक्ती संग्रामदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला मराठवाडा मुक्ती संग्राम क्रीडा महोत्सव अत्यंत उत्साहात पार पडला. या स्पर्धेचे आयोजन युथ पॉवर स्पोर्ट्स ॲकॅडमीच्या वतीने करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून भिकन आंबे, मनीष गोरे व आर्या शर्मिष्ठा उपस्थित होते.
या स्पर्धेत ग्रीन ग्लोब विद्या मंदिर, महाराष्ट्र पब्लिक स्कूल (अंबाजोगाई), स्वामी विवेकानंद विद्यालय, चिल्ड्रन्स पार्क स्कूल, ब्लूमिंग बोर्ड प्रायमरी स्कूल, चिल्ड्रन्स पार्क इंटरनॅशनल स्कूल तसेच युथ पॉवर स्पोर्ट्स ॲकॅडमी यासह एकूण २४४ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे आयोजन ग्रीन फील्ड इंटरनॅशनल स्कूल (शरणापूर) येथे करण्यात आले. खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत विविध क्रीडा प्रकारांमध्ये चमक दाखवली. यामध्ये लक्ष्मण कोळी, नरेंद्र बनसोडे, संदीप साखरे, अंकुश गायकवाड, भगवान जाधव, अक्षय पवार, प्रशांत लिंगायत यांच्यासह अनेक खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. या स्पर्धेचे सूत्रसंचालन आणि यशस्वी आयोजन योगेश पवार यांनी केले.