
मुंबई ः एम आय जी क्रिकेट क्लबच्यावतीने मुंबईत सुरू असलेल्या तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या उप उपांत्य सामन्यात ठाण्याच्या कुणाल राऊत याने आंतर राष्ट्रीय कॅरमपटू व विद्यमान आशियाई कॅरम विजेत्या मुंबईच्या महमंद घुफ्रानवर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत २५-११, ११-२५, २२-९ अशी मात करून उपांत्य फेरी गाठली.
महिला गटात उप उपांत्य सामन्यात रिंकी कुमारीने आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा कदमला २५-११, २०-२५, २५-६ असे हरवून आश्चर्याचा धक्का दिला. आतापर्यंत स्पर्धेत एकंदर १४ व्हाईट स्लॅम व ४ ब्लॅक स्लॅमची नोंद झाली आहे.
उप उपांत्य फेरीची इतर निकाल
पुरुष एकेरी गट ः प्रशांत मोरे (मुंबई) विजयी विरुद्ध विवेक कांबळे (मुंबई उपनगर), अभिजित त्रिपनकर (पुणे) विजयी विरुद्ध विकास धारिया (मुंबई), हरेश्वर बेतवंशी (मुंबई) विजयी विरुद्ध प्रफुल मोरे (मुंबई).
महिला एकेरी गट ः समृद्धी घाडीगावकर (ठाणे) विजयी विरुद्ध सोनाली कुमारी (मुंबई), चैताली सुवारे (ठाणे) विजयी विरुद्ध अंजली सिरीपुरम (मुंबई), केशर निर्गुण (सिंधुदुर्ग) विजयी विरुद्ध प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर).