
गणेश कड यांची माहिती
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा वरिष्ठ पुरुष व महिला गटांची बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धा व जिल्हा संघ निवड चाचणीचे आयोजन मराठवाडा सांस्कृतिक मंडळ येथे येत्या ७ व ८ ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले आहे, अशी माहिती संयोजक गणेश कड यांनी दिली.
नागपूर येथे २६ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनच्या वतीने होणाऱ्या ७५ व्या वरिष्ठ पुरुष व महिला वयोगटांच्या आंतर-जिल्हा राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघाच्या निवडीसाठी एमएसएम बास्केटबॉल स्पोर्ट्स असोसिएशन व जिल्हा व तालुका बास्केटबॉल असोसिएशन आणि जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धा व संघ निवड चाचणी घेण्यात येणार आहे.
ही स्पर्धा व निवड चाचणी ७ व ८ ऑक्टोबर या तारखेदरम्यान मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या बास्केटबॉल मैदानावर पार पडणार आहे. ही स्पर्धा व निवड चाचणीमध्ये कुठल्याही महाविद्यालयाचे, खासगी बास्केटबॉल अकादमीचे संघ सहभागी होऊ शकतात. ही स्पर्धा व निवड चाचणीच्या सहभागासाठी खेळाडूला शंभर रुपये नाममात्र शुल्क भरावे लागणार आहे. तसेच स्पर्धेत पुरुष व महिला गटांचे किमान चार संघांचा समावेश अनिवार्य राहील. अन्यथा निवड चाचणी घेण्यात येईल.
या स्पर्धेच्या व निवड चाचणीत अधिकाधिक खेळाडूंनी सहभाग घ्यावा. अधिक माहितीसाठी प्रशांत बुरांडे (9764307077) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटना सह-सचिव जयंंत देशमुख, जिल्हा व तालुका बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव मंजितसिंग दारोगा आणि जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव गणेश कड यांनी संयुक्तिकरित्या केले आहे.