
पुणे ः धनगरवाडी येथील शैक्षणिक क्षेत्रातील एक नवदुर्गा श्रीमती निर्मला ज्ञानेश्वर शेळके (वय ६२) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधीस शैक्षणिक, राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पत्रकार मंगेश शेळके व दैनिक पुणे वैभवचे पत्रकार राजेंद्रकुमार शेळके यांच्या त्या मातोश्री होत.