
तळवेल ही खो-खोची पंढरी – नितीन चवाळे
अमरावती (तुषार देशमुख) ः “तळवेल ही आता खो-खोची पंढरी झाली आहे,” असे गौरवोद्गार शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय खेळाडू डॉ नितीन चवाळे यांनी काढले. शंकर विद्यालय तळवेल येथे नुकतीच झालेली जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धा भव्य दिव्य व अविस्मरणीय ठरली
.उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थानी बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे होते. उद्घाटक म्हणून पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांमध्ये कॅप्टन नंदकिशोर चौधरी, सचिव नरेंद्रराव देशमुख, सहसचिव रविराज देशमुख, बबलू देशमुख, वैकुंठराव वानखडे, मुख्याध्यापक तुषार खोंड, भास्कर काळे आदींची उपस्थिती लक्षणीय ठरली.
समारोपीय कार्यक्रमाला डॉ नितीन चवाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी तळवेलमधील या स्पर्धांना “आदर्श स्पर्धा” असे संबोधले व सर्व खेळाडूंना खेळातून शासकीय सेवेत मिळणाऱ्या संधींबाबत मार्गदर्शन केले. मंडळाचे खेळाडू आफ्रोज शहा यांची आरोग्य विभागातील नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. पंचमंडळींचा सुद्धा गौरव करण्यात आला.
यशस्वी आयोजनकार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक शारीरिक शिक्षक संघटना चांदूरबाजारचे सचिव डॉ तुषार देशमुख यांनी केले. प्रिया देशमुख यांनी आभार मानले. स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी शंकर विद्यालय व शेष स्मृती क्रीडा मंडळातील कर्मचारी व खेळाडूंनी विशेष परिश्रम घेतले.
विजेतेपदाचा आलेख
स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षाखालील मुला-मुलींच्या गटांमध्ये जिल्ह्यातील विविध शाळांनी चुरशीची कामगिरी केली.
मुलांचे गट- १4 वर्षाखालील विजेता – शंकर विद्यालय, तळवेल (चांदूरबाजार), उपविजेता – खल्लार विद्यालय (दर्यापूर).
– १७ वर्षांखालील विजेता – आदर्श विद्यालय जवळा शहापूर
(चांदूरबाजार), उपविजेता – अचलपूर तालुका संघ.
- १९ वर्षांखालील विजेता – खल्लार विद्यालय, खल्लार (दर्यापूर), उपविजेता – अचलपूर तालुका संघ.
मुलींचे गट- १४ वर्षांखालील विजेता – आदर्श विद्यालय, भुगाव (अचलपूर), उपविजेता – खल्लार विद्यालय (दर्यापूर).
- १७ वर्षांखालील विजेता – आदर्श विद्यालय, भुगाव (अचलपूर), उपविजेता – प्रश्नचिन्ह आश्रम शाळा, नांदगाव खंडेश्वर.
-१९ वर्षांखालील विजेता – सीताबाई संगई कन्या विद्यालय (अंजनगाव), उपविजेता – बी डी एस, चांदुर रेल्वे.