मुंबई ः कळंबोली पोलिस मुख्यालय येथे संपन्न झालेल्या मुंबई विभाग स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत भाईंदर,पश्चिम येथील श्री गणेश आखाड्यातील तनुजा मांढरे आणि गणेश अडबल्लेने रौप्य, तर मनस्वी राऊत, प्रतिक बोबडेने कांस्य पदकाची कमाई केली.
तनुजाने १४ वर्षांखालील गटात तर गणेशने १९वर्षांखालील गटात दुसरा क्रमांक मिळवला. मनस्वीने १७ वर्षांखालील आणि प्रतिकने १४ वर्षांखालील विभागात तिसरे स्थान पटकावले. या सर्व पदक विजेत्यांना वस्ताद वसंतराव पाटील आणि वैभव माने यांचे मार्गदर्शन मिळाले.सर्व पदक विजेत्यांचे श्री गणेश आखाड्यातर्फे खास अभिनंदन करण्यात आले.